Thursday, March 6, 2025

असुरनाश - (भाग - १०)

 

 


असुरनाश – (भाग – १०)

 

आता कोणत्या व्हिडीओ बोलतोय हा? काय सुरु आहे नीतारा हे सगळ.विक्रमने नोट वाचुन विचारल

 

दादा, मला काहीच अंदाच येत नाहीये त्या दिवशी काय घडल कसला व्हिडीओ कोणती व्यक्ती काहीच कळत नाहीये तुच काय ते आता करु शकतोस. नितारा सांगते.

 

बर, बेटा काळजी करु नकोस मी लावतो याचा शोध हं.विक्रम समजावतो.

 

आणि दोघ ही स्नॅक्स घेउ लागतात.

 

काही वेळा नंतर...

 

आपल आवरुन दोघ ही कॅफेच्या बाहेर पडतात.

 

साधारणतः १ तासानी....

 

विक्रम निताराला सुखरुप घरी सोडतो.

 

निताराचे आई वडील तीची वाट बघतच असतात. तोच घरी विक्रम आणि नितारा येतात.

 

काय म्हणता काकु कसे आहात?” घरात प्रवेश करत विक्रमने विचारल

 

आम्ही मस्त आहोत पण तु कसा काय आज इकडे वाट चुकलास? तुला तर आगदी आग्रहाच निमंत्रणच द्याव लागत. ये.. ये..विक्रमला घरात बोलवत गायत्री म्हणाली

 

तोच तीच बोलण ऐकुन सगळे हसु लागले आणि हसता हसताच विक्रम सोफॅवर बसला.

 

काही नाही हो काकु तुम्हाला तर पोलीसांची नोकरी माहीतच आहे वेळच मिळत नाही काय करणार अगदी ठरउन जरी वेळ काढायचा म्हणला तरी मिळत नाही त्यातुन आता एक मिसींग केस आलीये त्यात अडकलोय जराविक्रम म्हणाला

 

हं, समजु शकते मी. बर काय घेणार तु निताराचा वाढदिवस आहे तीच्यासाठी पाव भाजी केलीये आज खाउनच जा. गायत्री विचारते

 

तस नितारा आणि विक्रम एकमेकांकडे बघुन हसु लागतात. एक क्षण गायत्री व राघवला काय झाल समजतच नाही.

 

काकु अहो आत्ता आम्ही डोसा आणि पाव भाजीचीच पार्टी करुन आलोय. दोघच होतो. पार्टी म्हणजे जस्ट तीला मीच आज कॅफेमध्दे घेउन गेलो होतो तीचा वाढदिवस आहे न म्हणल जाव घेउन तसही नेहमी म्हणत असते तु वेळच काढत नाहीस भेटतच नाहीस म्हणून विचार केला आज घेउन जावच.विक्रम म्हणाला.

 

अस आहे होय अरे मग मी उगीच पाव भाजी बनवली आता आमची नितारा कुठे पाव भाजी खाणार. (निताराला उद्देशुन). काय ग?”” हसुन गायत्री बोलते.

 

आणि सगळे हसु लागतात..

 

मग झाला की नाही वाढदिवस नितारा की अजुन काही बाकी आहे.चेष्टेने विक्रमने विचारल

 

दादा, रात्री १२ वाजता सगळ्यांनी सरप्राइज दिल आम्ही सगळ्यांनी मिळून केक कट केला, मग सकाळी कँटीनला माझा वाढदिवस साजरा झाला पण मेन गोष्ट बाकीच आहे ना आईने मला औक्षवण कुठे केलय ते झाल की वाढदिवस पुर्ण होइल माझा.उत्साहाने निताराने सांगितल

 

कर.. कर एंजॉय कर. चला मी निघतो खुप उशीर झालाय येतो मी. काळजी घे ग. जागेवरुन उठत विक्रम म्हणाला.

 

आणि घरा बाहेर पडला.

 

काही वेळा नंतर....

 

सगळ आवरल्यावर गायत्रीने लगेच ओवाळण्याची तयारी केली. आणि निताराला आवाज दिला.

 

बेटा, नितु... चल लवकर झालीये सगळी तयारी हॉलमधुनच गायत्रीने आवाज दिला.

 

आले आई ... खोलीतुन येता येता नितारा म्हणाली.

 

आणि लगेच खाली आली व खुर्चीवर बसली. तोच गायत्रीने तीला छान ओवाळल व आशिर्वाद दिले.

 

रात्री १० : ३० वाजता...

 

सगळ्यांनी छान पाव भाजी खाल्ली आणि झोपायला आपापल्या खोलीत गेले..

 

साधारणतः १२ वाजता....

 

निताराला शांत झोप लागली होती दिवसभरचा थकवा तीच्या चेह-यावर स्पष्ट जाणवत होता त्याच स्थीतीत ती झोपी गेली. आणि अचानक..

 

गडद अंधार फक्त डिजेचा आवाज येत होता. डांन्स फ्लोअर वर रोशनाई देखील दिसत होती. कुणी डान्स करण्यात मग्न होत कुणी फक्त पार्टीचा आनंद घेत होत. आणि अशातच एका मुलीला ४ जणांनी उचलुन नेल तोच ती मुलगी ओरडु लागली...

 

ओ माय गॉड किती भयानक स्वप्न होत. पण मला हे अस स्वप्न का पडल असेल आणि ती मुलगी कोण होती मला अस का वाटतय ती जागा मी या आधी कुठे तरी बघीतलीये. पाणी पीता पीताच नितारा विचार करु लागली.

 

क्रमशः

 

काय निताराला स्वप्न पडल? आणि त्या स्वप्नात ती एका पार्टीत होती कुणाची होती ता पार्टी आणि त्या पार्टीचा तीच्याशी काही संबंध तर नाही की गोष्ट काही वेगळीच आहे. जरा विचार करा तोपर्यंत मी येतेच पुढचा भाग घेउन मंगळवारी..

Monday, March 3, 2025

असुरनाश - (भाग - ९)

 

 


असुरनाश – (भाग – ९)

 

बैस, काय मागवू तुझ्यासाठी?” खुर्चीवर बसत विक्रम विचारतो.

 

काही नाही रे माझ अस काही नाहीये तु मागवशील ते. नितारा खुर्चीवर बसत सांगते.

 

अग, अस कस तुझी पण काही तरी आवड असेल न? बर जाऊ दे मी तुझ्यासाठी मागवतो. (वेटरला आवाज देत). एक्स्युज मी. विक्रम वेटरला आवाज देतो.

 

आणि लगेच आवाज ऐकुन एक वेटर त्यांच्या जवळ येतो आणि त्यांची ऑर्डर घेत त्यांना विचारतो.

 

बोला साहेब काय ऑर्डर आहे तुमची?” वेटर सुजीत ऑर्डर घेत विचारतो.

 

मला निताराची आवड माहीत आहे. तु एक काम कर मला वन प्लेट डोसा आणि नितारासाठी पाव भाजी सांग. नंतर दोन चहा जा.विक्रम ऑर्डर देऊन वेटरला पाठवून देतो.

 

आणि लगेच ऑर्डर घेऊन वेटर निघुन जातो. तर विक्रम आणि नितारा गप्पा मारु लागतात.

 

हं, तर बोल आता काय नेमका प्रॉब्लेम आहे तुझा मी तुझी काय मदत करु शकतो तुझी?” विक्रम प्रेमाने विचारतो.

 

दादा, एक खुप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि झालय अस कि, माझा प्रॉब्लेम मी कुणाला सांगू ही शकत नाही. ऍक्चुअली माझ्यावर कुणीतरी पाळत ठेऊन आहे. त्याला माझ्याबद्दल सगळ काही माहीत आहे मी काय करते कुठे जाते कोणा बरोबर असते अगदी त्याच्या जवळ माझे फोटोज सुध्दा आहेत. इनफॅक्ट काल १२ ए. एमला आई आणि बाबा नी जीथुन माझ्यासाठी केक आणला होता ते सुध्दा त्याला माहीत होत त्यानी आज सकाळी मला एक बुके पाठवला होता आणि ही चीठ्ठी ही होती त्या मध्दे. भीत भीत नितारा सांगते.

 

एक... एक मिनीट काय? तो तुला फॉलो करतोय? त्याला तुझ्यासाठी कुठून केक आणला हे ही माहीत आहे काय सांगतेस बघु ते लेटर.हातात लेटर घेत विक्रमने विचारल

आणि हातात लेटर घेउन वाचु लागला.

 

आयलवयु जानु,

वाढदिवसाच्या तुला खुप खुप सुभेच्छा. तु मला विसरली असशील पण मी अजुनही तीथेच अडकलो आहे काय करणार प्रेम केल आहे ना तुझ्यावर मग आता तुला माझी सारखी आठवण तर करुन द्यावीच लागेल नाही का. बर काल रात्री तुम्ही आधीच केक कट केला होता म्हणे कसा होता ग केक आवडला न तुला.

लक्षात ठेव माझी प्रत्येक क्षणी तुझ्यावर नजर आहे आता गेम परत स्टार्ट लेवल सेकंड इज बिगीन... येतोय मी ...

तुझाच आणि फक्त तुझाच

×××”

 

काही क्षणा नंतर...

 

लगेच दुसर लेटर वाचतो.

 

खबरदार... तुझ्या आयुष्यातली घटना कुणाला सांगितलीस तर परिणाम चांगले होणार नाहीत मी कोण आहे आणि माझा तुझ्याशी काय संबंध आहे हे तुला जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हाच कळेल त्या आधी नाही. लवकर तुला आणखी एक धक्का बसणार आहे  त्यासाठी तयार रहा अननोन व्यक्ती

 

काही क्षणा नंतर...

 

हं, तर... आई बाबांना माहीत आहे हे सगळ? नितारा ही खुप गंभीर गोष्ट आहे अग? बर हे कधी पासुन सुरु आहे?” लेटर्स नीट ठेवत विक्रम विचारतो.

 

जेव्हा आम्ही गायत्रीकडे पार्टीला गेलो होतो न तेव्हा पासुनच हे सुरु झालय त्यावेळी मला वाटल ग्रुपमधल्या कुणी तरी माझी मजा घेत असेल म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केल पण नंतर मात्र हे सगळ वाढत आणि मग मला भीती वाटायला लागली आणि काळजी सुध्दा.नितारा काळजीने सांगते.

 

नाही, नाही काळजी करु नकोस हे बघ सत्याला कुणी सुध्दा झुकउ शकत नसत. त्याला कीतीही लपवायचा प्रयत्न केला गेला तरी ते ऊघडकीस आल्याशिवाय रहात नाही तेव्हा आपण नक्की शोध घेउ तु चिंता करु नकोस हं.विक्रम समजावत सांगतो.

 

तोच वेटर डिश घेऊन येतो आणि सर्व करतो.

 

घे, सुरु कर सगळ ठीक होईल. आपली डिश जवळ ओढत विक्रम म्हणतो.

 

हं करते सुरु. काळजीयुक्त स्माईल करत नितारा म्हणते.

 

आणि आपली डीश जवळ ओढत जेवायला सुरु करणारच असते तोच. तीला आपल्या डिश खाली आणखी एक नोट सापडते. ती त्याला बाहेर काढते. आणि वाचू लागते.

 

मी तुला म्हणालो होतो न? माझ तुझ्याकडे पुरेपुर लक्ष आहे. तु हे बरोबर केल नाहीये आता याचे परिणाम तुला भोगावे लागतील आणि त्यासाठी आता तयार रहा आज तुझा एक व्हीडीओ सोशल साईट वर जाईल आणि मग तु व्हायरल.अननोन व्यक्ती

 

तोच नोट वाचून भीतीने नितारा विक्रमकडे बघते तीला एक क्षण काही सुचतच नाही ती एकदम सुन्न होऊन गेलेली असते तोच विक्रमच तीच्याकडे लक्ष जात आणि तो तीच्या हातातून नोट घेऊन वाचतो.

 

मी तुला म्हणालो होतो न? माझ तुझ्याकडे पुरेपुर लक्ष आहे. तु हे बरोबर केल नाहीये आता याचे परिणाम तुला भोगावे लागतील आणि त्यासाठी आता तयार रहा आज तुझा एक व्हीडीओ सोशल साईट वर जाईल आणि मग तु व्हायरल.अननोन व्यक्ती

 

दोघही लगेच एकमेकांकडे बघु लागतात.

 

क्रमशः...

 

काय निताराने शेवटी विक्रमची मदत घेतली? आणि हे त्या व्यक्तीला ही समजल मग आता पुढे काय होणार? आणि ती व्यक्ती निताराच्या कोणत्या व्हिडीओ बद्दल बोलत होती बघुत पुढील भागात


असुरनाश - (भाग - १०)

    असुरनाश – (भाग – १०)   “ आता कोणत्या व्हिडीओ बोलतोय हा ? काय सुरु आहे नीतारा हे सगळ. ” विक्रमने नोट वाचुन विचारल   “ दादा, मला ...