असुरनाश – भाग १
“ही कथा पुर्णतः
काल्पनिक आहे हीचा कुठल्याही जीवीत अथवा मृत व्यक्तीशी कसला ही संबंध नाही तरी तो
संबंध आलाच तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.”
खर तर प्रत्येक स्त्री
मध्ये दुर्गाचे रुप असते फरक एवढाच असतो कुणाला त्याची जाण असते तर कुणाल त्याची
जाणीव करुन द्यावी लागते.
या देवी सर्व भुतेशु
शक्ती रुपेण संस्थिता
नमःस्तसै नमःस्तसै
नमःस्तसै नमो नमः
वेळ सकाळी ७
वाजताची...
कल्पतरु हाउसिंग
सोसायटी...
निताराचा फ्लॅट...
आपल जॉगिंग संपवून
नितारा आपल्या फ्लॅटवर आली. आणि शुज काढत तीने तिच्या घरी काम करणारी राधा ताईंना
आवाज दिला.
“राधा ताई माझा चहा
रेडी आहे का आज ऑफिसला खुप काम आहे सो मला लौकर निघाव लागेल.” शुज काढत नितारा म्हणाली.
राधा ताई किचन मध्ये
आवरत होत्या तोच आवाज ऐकुन बाहेर हॉलमध्ये आल्या.
“ताई आवाज दिलात? थोड थांबा हं आज तुमच्या आवडीचे पराठे करत आहे. तुम्हाला आवडतात तसे.” आवरता आवरताच राधा ताई बाहेर आल्या आणि म्हणाल्या.
“ओ, वॉव.. ताई
तुम्ही नेहमीच माझी काळजी करत आल्या आहेत हं. थँक्यु सो मच पण थोड लौकर प्लीज.” परत आवरता आवरता नितारा म्हणाली.
आणि आपल्या रुम मध्ये आपल
आवरायला निघुन गेली. इकडे राधा ताई देखील परत किचन मध्ये निघुन गेल्या.
काही वेळा नंतर....
“राधा ताई, झाल का
ऑलरेडी खुप लेट झालाय आज खुप महत्वाच्या विषयावर मिटींग आहे माझी वेळेवर पोहोचले
नाही ना तर मी आहे आणि माझे बॉस आहेत.” आपल आवरुन नितारा
डायनिंग हॉल कडे येउन म्हणाली.
“हो, हो, ताई आले मी
हे घ्या मी तर तयारच होते. आणि हा तुमचा डबा.” पराठ्यांची
डीश हातात घेत राधा ताई आल्या आणि म्हणाल्या.
लगेच निताराने हातात
डीश घेतली व दोघी नाश्ता करु लागल्या.
काही वेळा नंतर....
दोघींनी नाश्ता केला
आणि नितारा लगेच ऑफिसच्या दिशेने रवाना झाली...
पण नेमक नितारा ही कोण
होती ? काय होत तीच बॅग्रांउंड ? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोड भूतकाळात डोकवाव लागेल.
नितारा. निताराच
आयुष्य तस संघर्षमयच होत पण तरी सुध्दा ती एक डॅशिंग निडर मुलगी होती. आई वडिलांची
एकुलती एक लाडाकोडात वाढलेली मुलगी. आणि ख-याला खर आणि खोट्याला खोट म्हणणारी
मुलगी आई वडिलांची लाडकी जरी असली तरी तीला इतर मुलां मुलीं सारख कुठल ही व्यसन
नव्हत बाहेर रहायची पार्टी करायची पण कधी वहात नाही गेली.
निताराचे वडील एक
बिझनेसमन होते तर आई केटरर्स होती. तीच्या आयुष्यात सगळ छान चालु होत. पण म्हणतात
न. “नजर देखील त्यालाच लागते जिथे सगळ काही छान
असत.” अगदी तसच निताराच्या बाबतीत देखील घडल. सगळ काही छान
सुरु असताना तिच्या कुटुंबाला कुणाची तरी नजर लागली आणि एका क्षणात होत्याच नव्हत
झाल.
वेळ रात्रीची १२
वाजताची...
कल्पतरु हाउसिंग
सोसायटी...
निताराच्या फ्लॅट
मध्ये....
आज निताराचा वाढदिवस
म्हणून गायत्री आणि राघवनी निताराला १२ वाजताच विष करायच ठरउन तीच्या सरप्राइजची
सगळी तयारी केली. तीच्या आवडीचा केक आणून ठेवला ती लौकर झोपायला जाताच त्यांनी
लगेच तीच्या जवळच्या मित्र मैत्रीणींना बोलाउन घेतल. अगदी छान सगळी तयारी करुन
सगळे १२ वाजता बरोबर तिच्या रुम मध्ये तीला विष करायला जमा झाले.
खोलीचे लाईट त्यावेळेस
बंदच होते रुममध्ये अंधार होता आणि निताराला झोप लागली होती. तोच हळूच राघवनी
दरवाजा उघडला आणि सगळे एकदम खोलीत शिरले व एकसुरात सगळ्यांनी तीला विष केल.
“हॅपि बर्थ डे
नितारा. बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जिओ हजारो साल ये मेरी है आरजु
हॅपि बर्थ डे टु यु हॅपि बर्थ डे टु यु हॅपि बर्थ डे टु नितारा हॅपि बर्थ डे टु यु.” एक सुरात सगळे गीत गाउन निताराला बर्थ डे विष करतात.
ते ऐकताच निताराला जाग
येते. ती सगळ्यांकडे स्तब्ध होउन बघतच राहाते. ह्या सरप्राइज वर आपण सगळ्यांना काय
बोलाव हेच एक क्षण तीला समजत नाही. त्या वेळी चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी एका
क्षणात तीला आठवुन जातात. आणि ती ते आठवून अचानक रडु लागते. ते बघुन सगळेजण तीच्या
कडे बघु लागतात.
काही वेळा नंतर....
ते बघुन निताराची आई
गायत्री निताराला विचारते.
“बेटा काय झाल अचानक
आज तुझा वाढदिवस आणि तु रडत आहेस? काय झाल सगळ ठीक आहे ना.”
काळजीने गायत्री विचारते.
आणि लगेच नितारा सांगु
लागते.
क्रमशः...
ही कथा एक स्त्री
प्रधान कथा आहे आता बघुत या कथेत पुढे काय होत.
%20-%20Freepik%20(170324123838).jpg)
No comments:
Post a Comment