असुरनाश – भाग २
“आई, एक मुलगी असण
स्त्री असण गुन्हा असतो का ग ? मान्य आहे मी रात्री पर्यंत
घरा बाहेर राहाते पार्टीज करते पण मी कधी ही आपली मर्यादा ओलांडली नाही कधीच
तुम्ही दिलेले संस्कार सोडुन वागले नाही मग त्या बाहेरच्या लोकांना अधिकार दिला
कोणी माझ्या आयुष्याशी खेळण्याचा ?” रडत रडत नितारा म्हणाली
“बेटा, काय झाल आहे
एकदा निट समजेल अस सांगणार आहेस का? जिवाला घोर लाउ नकोस बाई
आमच्या.” काळजीने गायत्री विचारते.
“जाउदे आई आज
वाढदिवस आहे माझा तुम्ही इतक छान सगळ अरेंज केल आहे आज फक्त एन्जॉयमेंट माझ्या
बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर (आपले डोळे पुसत) चला इतका मोठा घाट घातला आहेत
तुम्ही बर्थडे साजरा करायचा नाही का” चेह-यावर हसु आणूत आपले
पाणावलेले डोळे पुसत नितारा म्हणाली
“तरी पण बेटा, काय
झाल आहे हे बघ वाढदिवस प्रत्येक वर्षी येतो पण तुच जर आनंदी नसशील तुच जर खुश
नसशील तर काय अर्थ आहे या सगळ्या सेलीब्रेशनचा सांग बर.”
चेह-यावरुन हात फिरवत गायत्रीने विचारल.
नितारा मनात विचार करु
लागली.
काही क्षणा नंतर...
“आई अस काही नाही
आहे ग तु काळजी करु नकोस माझी मी ठीक आहे त्याच काय आहे न जरा कॉलेजच टेंन्शन होत
म्हणून काळजीत होते बस पण आता ओके आहे मी हं. चला केक कापुत आता.” आईच्या हातावर हात ठेवत नितारा म्हणाली.
“पक्क न, खरच काळजी
करण्यासारख नाहीये ना?” गायत्रीने काळजीने विचारल.
“हो, आई खरच काळजीच
कारण नाहीये चला आता केक कट करुत.” एक स्माईल करत नितारा म्हणाली.
तोच सगळे आनंदाने
निताराचा वाढदिवस साजरा करु लागले.
दुस-या दिवशी सकाळी...
कल्पतरु हाउसिंग
सोसायटी...
वेळ सकाळी ७
वाजताची....
“नितु बेटा उठ सकाळ
झाली आहे आज वाढदिवस अस उशीरा पर्यंत झोपण बर नाही कॉलेज मध्ये सगळे एन्जॉय करणार
असाल न चला उठा लवकर.” आवरता आवरता गायत्रीने निताराला आवाज
दिला.
आणि तीचा आवाज ऐकताच
नितारा जागी झाली. व आपल आवरायला गेली.
काही वेळा नंतर....
“बेटा, आवरल का तुझ
काय करत आहेस लवकर ये खाली तुला कुणी तरी बुके पाठवला आहे बघ.” नाश्त्याची तयारी करता करता गायत्रीने परत एकदा आवाज दिला.
तस गायत्रीचा आवाज
ऐकुन नितारा आपल्या रुम मधुन खाली उतरत आली. आणि मनाशीच म्हणाली.
“निरजनी बुके पाठवला
आहे वाटत आज काल विष केल नाही आणि आज बुके पाठवला वा. घरी येता येत नव्हत का याल
कॉलेज मध्ये बघते.” जिन्यावरुन पळत येत नितारा म्हणाली.
आणि दरवाज्या कडे
गेली...
“बुके, देताय ना.” बुकेवाल्याकडे बघत नितारा म्हणाली
“मॅडम नितारा,”
बुकेवाला म्हणाला
“अहो, मीच आहे
नितारा आणि तुम्ही तीलाच विचारत आहात आता देताय का अजुन कुणाची वाट पहायची आहे.” नितारा जरा तिरकस शब्दात म्हणाली.
खर तर तीला वाटल तीला
निरजने बुके पाठवला आहे म्हणून ती खुप एक्साइटेड होती. पण जेव्हा बुके मधील लेटर
बघीतल तीच्या पाया खालची जमीनच सरकली.
तीच बोलण ऐकताच
बुकेवाल्याने लगेच बुके दिला व तीथुन निघुन गेला. नितारा बुके घेते आणि बघते तर
त्यात एक लेटर असत ती लेटर काढते आणि वाचु लागते.
“आयलवयु जानु,
वाढदिवसाच्या तुला खुप
खुप सुभेच्छा. तु मला विसरली असशील पण मी अजुनही तीथेच अडकलो आहे काय करणार प्रेम
केल आहे ना तुझ्यावर मग आता तुला माझी सारखी आठवण तर करुन द्यावीच लागेल नाही का.
बर काल रात्री तुम्ही आधीच केक कट केला होता म्हणे कसा होता ग केक आवडला न तुला.
लक्षात ठेव माझी
प्रत्येक क्षणी तुझ्यावर नजर आहे आता गेम परत स्टार्ट लेवल सेकंड इज बिगीन...
येतोय मी ...
तुझाच आणि फक्त तुझाच
×××”
ते लाटर वाचताच नितारा
जमीनी वर कोसळली हे सगळ काय सुरु आहे हेच तीला समजत नाही
आणि तसच ती विचार करत
बसते.
“ही कोण व्यक्ती आहे
जीला माझ्या बद्दल इतक सगळ माहीत आहे काय सुरु काय आहे हे.”
नितारा आपल्याच विचारात असते
आणि तोच गायत्रीच
तिच्याकडे लक्ष जात.
क्रमशः...
काय? निताराला कुणी तरी त्रास देत आहे पण कोण
पाहुत पुढील भागात.
%20-%20Freepik%20(170324123838).jpg)
No comments:
Post a Comment