असुरनाश – भाग ३
“बाळ, काय झाल एकदम
बरी आहेस ना. उठ उठ,” गायत्री नितारा जवळ आली आणि निताराला
उठवल.
“काही नाही आई मी
ठीक आहे.” भित भितच नितारा म्हणाली.
आणि तीथुन निघुन
गेली....
त्यादिवशी निताराच
कशातच लक्ष लागत नाही ती लेटरच्याच विचारात असते.
काही वेळा नंतर...
निताराच्या खोलीत...
“काय करु ? सांगुन टाकू का आईला पण सांगणार काय मला माहीत ही नाहीये ती व्यक्ती कोण
आहे. कस बोलु आज वाढदिवस सगळ्यांनी कीती तयारी केलीये आणि....” नितारा आपल्याच खोलीत फे-या मारत विचार करत असते.
तोच फोन वाजतो...
ट्रिंग... ट्रिंग...
लगेच नितारा फोन
उचलते...
“हॅलो, कोण बोलतय.” नितारा फोन उचलुन विचारते.
“जानु... ओळखल नाहीस
का मला (कुत्सीतपणे हसत). किती गोड आवाज आहे ग तुझा ए तुला माहीत आहे का तु न जितकी
गोड बोलतेस न तीतकीच गोड दिसतेही बरं का. तुझी प्रत्येक गोष्ट गोडच आहे ग जानु.” अननोन व्यक्ती
“कोण आहेस तु का मला
त्रास देत आहेस एवढा.” नितारा घाबरुन विचारते.
ती खुप घाबरलेली असते
आणि तो मात्र कुत्सीतपणे हसत असतो. पण ही व्यक्ती असते तरी कोण काय असतो त्याचा
उद्देश्य आणि त्याला एवढ कस माहीत असत तीच्या बद्दल.
दरदरुन घामातल्या
अवस्थेत नितारा सुन्न होउन विचारमग्न असते एव्हाना त्याने ही आपला फोन ठेवलेला असतो.
ती इतकी घाबरलेली असते की तीच्या समोर कोण उभ आहे कोण आवाज देत आहे याची कसलीच
शुद्ध नसते. आणि त्याच अवस्थेत असताना तीला रुपल आवाज देते आणि ती भानावर येते.
“नितारा, ए अग बरी
आहेस ना तारा ऐकतेस न. अग भानावर ये.” निताराला भानावर आणत
रुपल म्हणाली.
तस नितारा आवाज ऐकताच
भानावर आली आणि ढसा ढसा रडायलाच लागली तीला आपण काय बोलाव हेच समजत नाही तीची
भीतीने अगदी गाळण उडालेली असते दरदरुन फुटलेला घाम घामाने ओलाचिंब झालेला चेहरा
नितारा खुपच वेगळी दिसत होती तीचा तो अवतार बघुन रुपल ही खुपच घाबरलेली होती. आणि
त्याच अवस्थेत तीने निताराला विचारल.
“तारा, काय ग काल
पासुन बघतोय आम्ही सगळे तुला. काय झालय तुला अं या आधी तु कधी अस वागली नाहीयेस
कुणी बोलल आहे का तुला काही अस मनात ठेवुन काहीच होणार नाहीये तारा प्लीज सांग जे
असेल ते सांग आपण मिळून सॉल्व करुत सगळ.” रुपल तीला समजावत
म्हणाली.
“रुपल, सांगते सगळ
सांगते पण त्या आधी तुझ्या भावाची भेट घडवुन देतेस का प्लीज तो एक पोलीत ऑफिसर आहे
ना मला जरा त्याच्याशीच बोलायच आहे आणि ईथे नको आपण दुसरीकडे कुठे तरी भेटुत
चालेका.” आपले डोळे पुसत नितारा म्हणते
“अग त्यात काय चालेल
की, आणि दुसरीकडे कशाला आपण डायरेक्ट हेडक्वार्टरला जाउत ना तीथेच भेटुत त्याला
बोल तुला कधी भेटायच आहे.” रुपल विचारते
“नाही नको,
हेडक्वार्टरला नको आपण दुसरी कडे भेटुत तुला माहीत आहे न डॅड बीझनेसमन आहेत मी
हेडक्वार्टरला गेले तर लगेच समजेल सर्वांना आणि डॅडना ही काळजी वाटेल म्हणून.” नितारा म्हणाली
"ठीक आहे
चालेल. बर कॉलेजमध्ये भेटणार आहेस न आज खुप स्पेशल डे आहे बर का आज त्यामुळे कुठले
बहाने चालणार नाहीये आज.” रुपल म्हणाली.
“हो बाई, स्पेशल डे
कसा विसरेन मी येणार आहे कॉलेजला आणि तसही हे सगळ मात्र विसरायला हवच न नाही तर
एकसारख आई डॅड मला विचारत राहतील आणि सध्यातरी याची काहीच उत्तर नाहीये माझ्याजवळ.
फक्त कुणाला हे सांगु नकोस हं प्लीज.” नितारा म्हणते.
आणि दोघी स्माईल करुन
खोली बाहेर येतात. तोच समोर निताराचे वडील राघव येतात. आणि विचारतात.
“सगळ ओके चॅम्प ,” राघव काळजीने विचारतात.
“यस, डॅड बिलकुल बर
मी कॉलेजला निघते हं. मला यायला थोडा उशीर होईल तुम्ही काळजी करु नका.” नितारा समजावत सांगते.
आणि दोघी कॉलेजसाठी
बाहेर पडतात. पण निताराच मात्र लक्ष नसत. तीला सतत भीती वाटत असते. आणि म्हणून
तीच्या मनात एकच विचार घोळत असतो. “कोण आहे ती व्यक्ती आपल्यावर पाळत ठेवणारी.” आणि ती
त्या विचारात पुन्हा एकदा मग्न होउन जाते.
काही वेळा नंतर....
त्या दोघी कॉलेजला
पोहोचतात. रुपल तीला भानावर आणते आणि ती भानावर येत विचारते.
“अं आल कॉलेज?”
भानावर येत नितारा विचारते.
क्रमशः...
तर... निताराच्या
आयुष्यात कुणी तरी अननोन व्यक्तीची एंट्री झाली आहे. कोण आहे ती व्यक्ती काय आहे
तीचा संबंध आणि नितारा त्याचा कसा शोध घेईल पाहुत पुढील भागात.
%20-%20Freepik%20(170324123838).jpg)
No comments:
Post a Comment