Thursday, March 6, 2025

असुरनाश - (भाग - १०)

 

 


असुरनाश – (भाग – १०)

 

आता कोणत्या व्हिडीओ बोलतोय हा? काय सुरु आहे नीतारा हे सगळ.विक्रमने नोट वाचुन विचारल

 

दादा, मला काहीच अंदाच येत नाहीये त्या दिवशी काय घडल कसला व्हिडीओ कोणती व्यक्ती काहीच कळत नाहीये तुच काय ते आता करु शकतोस. नितारा सांगते.

 

बर, बेटा काळजी करु नकोस मी लावतो याचा शोध हं.विक्रम समजावतो.

 

आणि दोघ ही स्नॅक्स घेउ लागतात.

 

काही वेळा नंतर...

 

आपल आवरुन दोघ ही कॅफेच्या बाहेर पडतात.

 

साधारणतः १ तासानी....

 

विक्रम निताराला सुखरुप घरी सोडतो.

 

निताराचे आई वडील तीची वाट बघतच असतात. तोच घरी विक्रम आणि नितारा येतात.

 

काय म्हणता काकु कसे आहात?” घरात प्रवेश करत विक्रमने विचारल

 

आम्ही मस्त आहोत पण तु कसा काय आज इकडे वाट चुकलास? तुला तर आगदी आग्रहाच निमंत्रणच द्याव लागत. ये.. ये..विक्रमला घरात बोलवत गायत्री म्हणाली

 

तोच तीच बोलण ऐकुन सगळे हसु लागले आणि हसता हसताच विक्रम सोफॅवर बसला.

 

काही नाही हो काकु तुम्हाला तर पोलीसांची नोकरी माहीतच आहे वेळच मिळत नाही काय करणार अगदी ठरउन जरी वेळ काढायचा म्हणला तरी मिळत नाही त्यातुन आता एक मिसींग केस आलीये त्यात अडकलोय जराविक्रम म्हणाला

 

हं, समजु शकते मी. बर काय घेणार तु निताराचा वाढदिवस आहे तीच्यासाठी पाव भाजी केलीये आज खाउनच जा. गायत्री विचारते

 

तस नितारा आणि विक्रम एकमेकांकडे बघुन हसु लागतात. एक क्षण गायत्री व राघवला काय झाल समजतच नाही.

 

काकु अहो आत्ता आम्ही डोसा आणि पाव भाजीचीच पार्टी करुन आलोय. दोघच होतो. पार्टी म्हणजे जस्ट तीला मीच आज कॅफेमध्दे घेउन गेलो होतो तीचा वाढदिवस आहे न म्हणल जाव घेउन तसही नेहमी म्हणत असते तु वेळच काढत नाहीस भेटतच नाहीस म्हणून विचार केला आज घेउन जावच.विक्रम म्हणाला.

 

अस आहे होय अरे मग मी उगीच पाव भाजी बनवली आता आमची नितारा कुठे पाव भाजी खाणार. (निताराला उद्देशुन). काय ग?”” हसुन गायत्री बोलते.

 

आणि सगळे हसु लागतात..

 

मग झाला की नाही वाढदिवस नितारा की अजुन काही बाकी आहे.चेष्टेने विक्रमने विचारल

 

दादा, रात्री १२ वाजता सगळ्यांनी सरप्राइज दिल आम्ही सगळ्यांनी मिळून केक कट केला, मग सकाळी कँटीनला माझा वाढदिवस साजरा झाला पण मेन गोष्ट बाकीच आहे ना आईने मला औक्षवण कुठे केलय ते झाल की वाढदिवस पुर्ण होइल माझा.उत्साहाने निताराने सांगितल

 

कर.. कर एंजॉय कर. चला मी निघतो खुप उशीर झालाय येतो मी. काळजी घे ग. जागेवरुन उठत विक्रम म्हणाला.

 

आणि घरा बाहेर पडला.

 

काही वेळा नंतर....

 

सगळ आवरल्यावर गायत्रीने लगेच ओवाळण्याची तयारी केली. आणि निताराला आवाज दिला.

 

बेटा, नितु... चल लवकर झालीये सगळी तयारी हॉलमधुनच गायत्रीने आवाज दिला.

 

आले आई ... खोलीतुन येता येता नितारा म्हणाली.

 

आणि लगेच खाली आली व खुर्चीवर बसली. तोच गायत्रीने तीला छान ओवाळल व आशिर्वाद दिले.

 

रात्री १० : ३० वाजता...

 

सगळ्यांनी छान पाव भाजी खाल्ली आणि झोपायला आपापल्या खोलीत गेले..

 

साधारणतः १२ वाजता....

 

निताराला शांत झोप लागली होती दिवसभरचा थकवा तीच्या चेह-यावर स्पष्ट जाणवत होता त्याच स्थीतीत ती झोपी गेली. आणि अचानक..

 

गडद अंधार फक्त डिजेचा आवाज येत होता. डांन्स फ्लोअर वर रोशनाई देखील दिसत होती. कुणी डान्स करण्यात मग्न होत कुणी फक्त पार्टीचा आनंद घेत होत. आणि अशातच एका मुलीला ४ जणांनी उचलुन नेल तोच ती मुलगी ओरडु लागली...

 

ओ माय गॉड किती भयानक स्वप्न होत. पण मला हे अस स्वप्न का पडल असेल आणि ती मुलगी कोण होती मला अस का वाटतय ती जागा मी या आधी कुठे तरी बघीतलीये. पाणी पीता पीताच नितारा विचार करु लागली.

 

क्रमशः

 

काय निताराला स्वप्न पडल? आणि त्या स्वप्नात ती एका पार्टीत होती कुणाची होती ता पार्टी आणि त्या पार्टीचा तीच्याशी काही संबंध तर नाही की गोष्ट काही वेगळीच आहे. जरा विचार करा तोपर्यंत मी येतेच पुढचा भाग घेउन मंगळवारी..

Monday, March 3, 2025

असुरनाश - (भाग - ९)

 

 


असुरनाश – (भाग – ९)

 

बैस, काय मागवू तुझ्यासाठी?” खुर्चीवर बसत विक्रम विचारतो.

 

काही नाही रे माझ अस काही नाहीये तु मागवशील ते. नितारा खुर्चीवर बसत सांगते.

 

अग, अस कस तुझी पण काही तरी आवड असेल न? बर जाऊ दे मी तुझ्यासाठी मागवतो. (वेटरला आवाज देत). एक्स्युज मी. विक्रम वेटरला आवाज देतो.

 

आणि लगेच आवाज ऐकुन एक वेटर त्यांच्या जवळ येतो आणि त्यांची ऑर्डर घेत त्यांना विचारतो.

 

बोला साहेब काय ऑर्डर आहे तुमची?” वेटर सुजीत ऑर्डर घेत विचारतो.

 

मला निताराची आवड माहीत आहे. तु एक काम कर मला वन प्लेट डोसा आणि नितारासाठी पाव भाजी सांग. नंतर दोन चहा जा.विक्रम ऑर्डर देऊन वेटरला पाठवून देतो.

 

आणि लगेच ऑर्डर घेऊन वेटर निघुन जातो. तर विक्रम आणि नितारा गप्पा मारु लागतात.

 

हं, तर बोल आता काय नेमका प्रॉब्लेम आहे तुझा मी तुझी काय मदत करु शकतो तुझी?” विक्रम प्रेमाने विचारतो.

 

दादा, एक खुप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि झालय अस कि, माझा प्रॉब्लेम मी कुणाला सांगू ही शकत नाही. ऍक्चुअली माझ्यावर कुणीतरी पाळत ठेऊन आहे. त्याला माझ्याबद्दल सगळ काही माहीत आहे मी काय करते कुठे जाते कोणा बरोबर असते अगदी त्याच्या जवळ माझे फोटोज सुध्दा आहेत. इनफॅक्ट काल १२ ए. एमला आई आणि बाबा नी जीथुन माझ्यासाठी केक आणला होता ते सुध्दा त्याला माहीत होत त्यानी आज सकाळी मला एक बुके पाठवला होता आणि ही चीठ्ठी ही होती त्या मध्दे. भीत भीत नितारा सांगते.

 

एक... एक मिनीट काय? तो तुला फॉलो करतोय? त्याला तुझ्यासाठी कुठून केक आणला हे ही माहीत आहे काय सांगतेस बघु ते लेटर.हातात लेटर घेत विक्रमने विचारल

आणि हातात लेटर घेउन वाचु लागला.

 

आयलवयु जानु,

वाढदिवसाच्या तुला खुप खुप सुभेच्छा. तु मला विसरली असशील पण मी अजुनही तीथेच अडकलो आहे काय करणार प्रेम केल आहे ना तुझ्यावर मग आता तुला माझी सारखी आठवण तर करुन द्यावीच लागेल नाही का. बर काल रात्री तुम्ही आधीच केक कट केला होता म्हणे कसा होता ग केक आवडला न तुला.

लक्षात ठेव माझी प्रत्येक क्षणी तुझ्यावर नजर आहे आता गेम परत स्टार्ट लेवल सेकंड इज बिगीन... येतोय मी ...

तुझाच आणि फक्त तुझाच

×××”

 

काही क्षणा नंतर...

 

लगेच दुसर लेटर वाचतो.

 

खबरदार... तुझ्या आयुष्यातली घटना कुणाला सांगितलीस तर परिणाम चांगले होणार नाहीत मी कोण आहे आणि माझा तुझ्याशी काय संबंध आहे हे तुला जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हाच कळेल त्या आधी नाही. लवकर तुला आणखी एक धक्का बसणार आहे  त्यासाठी तयार रहा अननोन व्यक्ती

 

काही क्षणा नंतर...

 

हं, तर... आई बाबांना माहीत आहे हे सगळ? नितारा ही खुप गंभीर गोष्ट आहे अग? बर हे कधी पासुन सुरु आहे?” लेटर्स नीट ठेवत विक्रम विचारतो.

 

जेव्हा आम्ही गायत्रीकडे पार्टीला गेलो होतो न तेव्हा पासुनच हे सुरु झालय त्यावेळी मला वाटल ग्रुपमधल्या कुणी तरी माझी मजा घेत असेल म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केल पण नंतर मात्र हे सगळ वाढत आणि मग मला भीती वाटायला लागली आणि काळजी सुध्दा.नितारा काळजीने सांगते.

 

नाही, नाही काळजी करु नकोस हे बघ सत्याला कुणी सुध्दा झुकउ शकत नसत. त्याला कीतीही लपवायचा प्रयत्न केला गेला तरी ते ऊघडकीस आल्याशिवाय रहात नाही तेव्हा आपण नक्की शोध घेउ तु चिंता करु नकोस हं.विक्रम समजावत सांगतो.

 

तोच वेटर डिश घेऊन येतो आणि सर्व करतो.

 

घे, सुरु कर सगळ ठीक होईल. आपली डिश जवळ ओढत विक्रम म्हणतो.

 

हं करते सुरु. काळजीयुक्त स्माईल करत नितारा म्हणते.

 

आणि आपली डीश जवळ ओढत जेवायला सुरु करणारच असते तोच. तीला आपल्या डिश खाली आणखी एक नोट सापडते. ती त्याला बाहेर काढते. आणि वाचू लागते.

 

मी तुला म्हणालो होतो न? माझ तुझ्याकडे पुरेपुर लक्ष आहे. तु हे बरोबर केल नाहीये आता याचे परिणाम तुला भोगावे लागतील आणि त्यासाठी आता तयार रहा आज तुझा एक व्हीडीओ सोशल साईट वर जाईल आणि मग तु व्हायरल.अननोन व्यक्ती

 

तोच नोट वाचून भीतीने नितारा विक्रमकडे बघते तीला एक क्षण काही सुचतच नाही ती एकदम सुन्न होऊन गेलेली असते तोच विक्रमच तीच्याकडे लक्ष जात आणि तो तीच्या हातातून नोट घेऊन वाचतो.

 

मी तुला म्हणालो होतो न? माझ तुझ्याकडे पुरेपुर लक्ष आहे. तु हे बरोबर केल नाहीये आता याचे परिणाम तुला भोगावे लागतील आणि त्यासाठी आता तयार रहा आज तुझा एक व्हीडीओ सोशल साईट वर जाईल आणि मग तु व्हायरल.अननोन व्यक्ती

 

दोघही लगेच एकमेकांकडे बघु लागतात.

 

क्रमशः...

 

काय निताराने शेवटी विक्रमची मदत घेतली? आणि हे त्या व्यक्तीला ही समजल मग आता पुढे काय होणार? आणि ती व्यक्ती निताराच्या कोणत्या व्हिडीओ बद्दल बोलत होती बघुत पुढील भागात


Wednesday, January 22, 2025

असुरनाश - (भाग ८)

 



असुरनाश – (भाग ८)

 

हो, दादा अगदी खरय मी खुपदा माझ्या क्लासमेट बरोबर शीनाला बघीतल आहे. राकेश नाव आहे त्याच दोघही बहीण भाऊ सारखेच शीनाला बारची आवड आणि राकेशला दादागिरीची आवड गँग बरोबर उनाडक्या करत फिरायच सिनीअर्स बरोबर राहुन आपल्याच क्लासमधल्या मुला मलींना छळायच एवढच दोघांना जमत. (थोडस थांबून) हो, करेट मी सुध्दा रेश्माला राकेश बरोबर बघितल होत. बिचारी खुप रडत होती ती.रुपल फोटो पाहुन सांगते

 

हे ऐकताच विक्रम विचार करु लागतो.

 

हं, म्हणजे रेश्माला गायब करण्यात या दोघांचा तर हात नसेल फोटोकडे बघत विक्रम विचार करु लागतो.

 

काही क्षणा नतंर...

 

विक्रम विचार करतो आणि लगेच आपला असिस्टंट सुसृतला फोन करतो.

 

फोनची रिंग वाजते. तोच समोरुन सुसृत फोन ऊचलतो.

 

हॅलो सर तुम्ही कॉल केला होतात?” सुसृत

 

हो, ती संजीवन कॉलेजच्या मुलीची मिंसीग केसमध्ये एक वेगळ वळण आलय मी तुला काही डिटेल्स सेंड करतो तु तीची अजुन माहीती मिळते का ते बघ आणि मला कळव.विक्रम सांगतो

 

हो, सर मी माहीती काढतो तुम्ही मला डिटेल्स पाठवा.सुसृत

 

ओके, मी लगेच पाठवतो. विक्रम म्हणतो.

 

आणि दोघ ही आपापले फोन ठेऊन देतात. लगेच विक्रम डिटेल्स पाठवतो.

काही क्षणा नंतर...

 

दादा, मी येऊ का आता खुप ऊशीर झालाय ओलरेडी.नितारा विचारते.

 

अग, थांब एवढी घाई काय आहे मी तुला सोडतो. विक्रम बोलतो.

 

ठीट आहे पण थोड लवकर हं.स्माईल करुन नितारा म्हणते.

 

लगेच विक्रम आपल आवरायला जातो.

 

काही वेळा नंतर...

 

हं, चल आता निघुत आपण. तु तयार आहेस?” विक्रम कॉलर ठीक करत विचारतो.

 

हो, चल आपण निघुत दादा. नितारा म्हणते.

 

आणि लगेच दोघ ही निताराच्या घरी रवाना होतात.

 

एक विचारु नितारा तुला? तुला राग तर येणार नाही ना. विक्रम विचार.

 

हो, विचार की त्यात एवढी फॉरमॅलिटी कसली रे?” नितारा

 

काही नाही ग आधी मला सांग तुला माझ्यावर विश्वास आहे ना.विक्रम विचारतो

 

दादा, काय झालय? अचानक अस का विचारत आहेस? ओह, समजल माझा प्रॉब्लेम न. (थोडस थांबून). दादा, त्या प्रॉब्लेम बद्दल मलाच अजून माहीत नाहीये ती कोण व्यक्ती आहे, तीचा माझ्याशी काय संबंध काहीच कळत नाहीये मला. मग मी तुला काय सांगणार होते तुच बोल.काळजीने नितारा सांगते

व्यक्ती? कोण व्यक्ती? नितु बाळा तुला एक सांगतो आपली फॅमिली एकमेकांची फॅमिली फ्रेंड आहे. याच नात्याने जशी माझ्यासाठी रुपल आहे तशीच तु ही आहेस तेव्हा तुला काहीच काळजी करण्याच कारण नाहीये बेटा मी तुझा ही मोठा भाऊच आहे. तु मला तुझा प्रॉब्लेम शेअर करु शकतेस एक काम करायच का आपण घरी जाता एका कॅफेमध्ये जाऊत चालेल. तु मला सांग तुला काय सांगायच आहे ते मग पाहुत आपण कसा शोध लावायचा ते हं.गाडी चालवता चालवता विक्रम विचारतो.

 

ठीक आहे, दादा जाऊत आपण कॅफेत चल. तुला मी सांगते सगळ. स्मीत हास्य करत नितारा म्हणते.

 

आणि दोघ ही सन शाइन कॅफेत जातात.

 

साधारण एक तासा नंतर...

 

सन शाइन कॅफेत...

 

वेळ रात्री ८ वाजताची...

 

सन शाइन कॅफे नुसत गजबजलेल असत. रात्र असल्याने नुसता झगमगाट असतो आणि अशातच विक्रम कॅफेत कार घेऊन येतो. कुणी आपली गाडी पार्क करत असत तर वेटर्स आपापली काम करण्यात मग्न असतात. तोच आपली कार पार्क करुन दोघ कॅफेत शिरतात.

 

विक्रम एकदा कॅफेवरुन नजर फिरवतो. आणि म्हणतो.

 

नितारा तो बघ समोरचा टेबल रिकामा झालाय आपण तिथे बसुत चल.विक्रम म्हणतो.

 

आणि दोघ टेबल कडे वळतात.

 

क्रमशः...

 

काय तर नितारा शेवटी आपला प्रॉब्लेम विक्रमला सांगणार. पण याचा उलटा परिणाम तर होणार नाही न. समजणार तर नाही ना त्या व्यक्तीला बघुत पुढील भागात.


Tuesday, January 21, 2025

असुरनाश - (भाग ७)

 


असुरनाश – भाग ७

 

ये, तु हॉल मध्ये बस तोपर्यंत मी स्केच आर्टीस्टना बोलावतो.विक्रम निताराला हॉलमध्ये बसवतो.

 

विक्रम निताराला हॉलमध्ये बसउन स्केच आर्टीस्टना फोन करायला आपल्या रुम मध्ये निघुन जातो.

 

फोनची रिंग वाजते...

 

तोच स्केच आर्टीस्ट अजीत आपला फोन उचलतो.

 

हॅलो, बोला साहेब काय मदत करु शकतो मी तुमची?” स्केच आर्टीस्ट अजीत विचारतो.

 

अजीत एक काम आहे तुझ्याकडे एक स्केच काढायच आहे येउ शकतोस का?” विक्रम

 

हो, लगेच येतो साहेब निघालोच.” स्केच आर्टीस्ट अजीत

 

हो.. हो.. पण ऑफिस मध्ये नाही तुला घरी याव लागणार आहे मी तुला ऍडरेस सेंड करतो तु लगेच निघ. विक्रम सांगतो.

 

ओके, साहेब तुम्ही ऍडरेस सेंड करा मी लगेच निघतो. स्केच आर्टीस्ट अजीत

 

दोघ ही आपापल बोलण संपवतात आणि फोन ठेउन देतात. लगेच विक्रम अजीतला आपला ऍडरेस सेंड करतो. आणि तोच अजीत विक्रमकडे जायला निघतो.

 

काही वेळा नंतर...

 

नितारा रुपल आणि रुपलचे आई बाबा गप्पा मारत बसलेले असतात. तोच आपल्या रुम मधुन विक्रम बाहेर येतो.

मग, काय नितारा आज दिवसभर काय केलस आज वाढदिवस आहे ना तुझा?” शालीनी विचारते

 

शालीनी रुपल आणि विक्रमची आई आणि गायत्री दोघी मैत्रीणी आणि पार्टनर असतात त्यामुळे रुपलची फॅमिली निताराला आणि तीच्या फॅमिलीला चांगलच ओळखत असतात. त्याच नात्याने शालीनी विचारते.

 

हो, काकु माझा आज वाढदिवस आहे आम्ही फ्रेंड्सनी मीळून खुप एंजॉय केल आज.” नितारा सांगते.

 

हो, न आई निताराचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असते आज इतक एंजॉय केलय आम्ही विचारु नकोस.आनंदात येउन रुपल सांगते.

 

का विचारायच नाही रुप्स काही लपवत आहेस वाटत. चेष्टेने विक्रम विचारतो.

 

काय रे दादु, काही पण हं... रुपल म्हणते.

 

आणि सगळे एकदम हसु लागतात. तोच अजीत येतो.

 

मी आत येउ का सर?” दारावर नॉक करत अजीत विचारतो.

 

अरे, ये.. ये अजीत फॉरमॅलिटी कसली ये आत ये. विक्रम म्हणतो.

 

तोच अजीत घरात येतो.

 

ये अजीत मी तुझीच वाट बघत होतो मी तुझी ओळख करुन देतो. ही नितारा ही आपल्याला स्केच बनउन देण्यात मदत करणार आहे आता ही जस जस सांगेल तस तस मला स्केच काढून दे. निताराची ओळख करुन देत विक्रम सांगतो

 

लगेच तीघही स्केच काढायला सुरवात करतात.

 

काही वेळा नंतर...

सर, स्केच तयार झालय.स्केच दाखवत अजीत सांगतो.

 

काय? स्केच तयार झालय गुड, बघु. नितारा एकदा तु ही बघ ही तीच मुलगी आहे. स्केच बघत विक्रम म्हणतो.

 

नितारा स्केच बघायला येते आणि लगेच म्हणते.

 

हो दादा, ही तीच मुलगी आहे कनर्फम. नितारा स्केच बघुन सांगते.

 

इकडे हे सगळ बघुन रुपलला आश्चर्य वाटत आणि ती लगेच निताराला विचारते.

 

नितारा (हळु आवाजात). काय आहे हे तु सांगणार नव्हतीस न. रुपल विचारते.

 

अग, मी दादाला त्या मिसींग केस मध्ये मदत करत आहे शांत रहा थोडी. नितारा सांगते

 

बघु कोण मुलगी आहे ती?” स्केचकडे बघत रुपल म्हणते.

 

आणि स्केच बघते. तर लगेच आश्चर्याने म्हणते.

 

ही तर शीना आहे मी चांगलीच ओळखते हीला हीचा लहान भाउ माझा क्लासमेट आहे. नेहमी क्लब एन शाइन बार मध्ये टल्ली होउन पडलेली असते विचारणार कोणीच नाही त्यामुळे आपल्याच मर्जीची मालक. पण तुला हीच का बर स्केच हव होत.?” रुपल विचारते.

 

रुपल तु सांगितलेल खरय?” विक्रम विचारतो.

आणि लगेच रुपल मानेनेच होकार देते.

 

क्रमशः

काय रेश्मा मिसींग केस मधली सगळ्यात मोठी लिड इतक्या लवकर मिळाली काही गडबड तर नाही ना बघुत पुढील भागात.


Wednesday, January 15, 2025

असुरनाश - (भाग - ६)




असुरनाश – भाग ६

 

अरे, दादा तू ? तू कधी आलास मी कधी पासुन तुझी वाट बघत होते बैस न. विक्रमला बसायला सांगत नितारा म्हणते.

 

आणि विक्रम लगेच आपल्या खुर्चीवर बसतो.

 

हं, बोल तुला काय मला सांगायच आहे ते. खर तर मी सुद्धा आज तुला नोटीस केल होत की, तु कसल्या तरी काळजीत आहेस पण मी स्वःताच माझ्या विचारात होतो म्हणून काही बोललो नाही आणि सगळा राग तुझ्या मैत्रीणीवर निघाला. आता बोल तुला काय सांगायच आहे ते. विक्रम ने विचारल

 

अरे, दादा ते सोड आपण मझ्या बद्दल नंतर बोलुत तु सकाळी ज्या मुली बद्दल मला विचारत होतास न त्याची एक लिंक मला आठवली आहे म्हणून तुला बोलाउन घेतल आणि सॉरी बर का सकाळी एवढ तु मला आवाज देत होतास आणि मी तुझ्याशी काहीच न बोलता निघुन गेले आय एम सो सॉरी. नितारा सांगते.

 

तु त्या मुलीचा विचार करुन मला बोलाउन घेतलस? म्हणजे तुला तुझ्या बद्दल काहीच सांगायच नाहीये मला?” विक्रमने आश्च-याने विचारल

 

दादा, प्लीज थोड हळु इथे आपल ऐकणारे बरेच जण आहेत खर तर मला माझ्या विषयाबद्दल देखील बोलायच आहे पण आज नको आज त्या मुली बद्दल बोलुत मला एक खुप मोठी लिंक आठवली आहे पण ती लिंक तुझ्या कितपत कामी येइल हे काही मला सांगता येणार नाही. निताराने सांगितल

 

नितारा, मला खरच तुझ खुप कौतुक वाटतय ग तु स्वःता प्रॉब्लेम मध्दे आहेस आणि तरी त्या मुलीचा विचार करत आहेस तु खुप ग्रेट आहेस बर सांग तुला काय माहीत आहे तीच्या बद्दल आणि हो तु काळजी करु नकोस हं मी आहे तुझ्याबरोबर. विक्रम समजावत म्हणाला.

 

खर तर दादा मला जास्त माहीत नाही पण ती आमच्या हॉस्टेलवर नव्यानेच आली होती मी हॉस्टेल वर रहात नाही पण माझ्या ब-याच मैत्रीणी हॉस्टेल वर रहातात मी अधुन मधुन त्यांना भेटायला जात असते असच एक महीन्या पुर्वी सुद्धा गेले होते तेव्हा मी बघीतल की, तीन चार मुलींनी तीला घेरल होत आणि काही तरी तीला पाजत होते. आणि नेमक मी तीथे पोहोचले पण त्या मुली नेमक्या कोण होत्या हे माहीत नाही मला. नितारा म्हणाली.

काय? तु त्या मुलींना तीला काही तरी पाजताना बघीतलस? म्हणजे नेमक काय पाजत होत्या त्या मुली तीला आणि अजुन काही सांगु शकतेस का तीच्या बद्दल म्हणजे तीच नाव वगैरे.?” विक्राम विचारतो.

 

तीच नाव रेश्मा. हो मी रेश्माच ऐकल होत तेव्हा. पण त्या मुलीं बद्दल सांगु शकणार नाही मी काही.नितारा सांगते.

 

अग, तुला माहीत नाही तु कीती मोठी लिंक सांगितली आहेस या वरुन खुप काही समजेल मला. ओके मला एक सांग तु क्लीयर बघीतल होतस त्या मुलींना.विक्रम विचारतो

 

हो, मी त्यांना क्लीयर बघीतल होत. नितारा सांगते.

 

मग, तु त्यांच स्केच काढुन देण्यात मला मदत करशील.?” विक्रम

 

हो, नक्कीच कारण त्यांचा चेहरा माझ्या डोक्यात पक्का बसलेला आहे म्हणून मी त्यांच स्केच काढून देण्यास नक्कीच तुला मदत करेल. नितारा

 

ग्रेट, पण तु इतक क्लीयरली कस सांगु शकत आहेस तुला अजुन काही आठवत आहे का?”

 

हो, दादा ऍक्चुली त्या मुलीं मधल्या एका मुलीच्या हातात मी एक पुडी बघीतली होती आणि ती पावडर ती एकसारखी आपल्या नाकात घालत होती. आणि त्या मुलींना मी एक दोनदा प्रिंन्सीपल सरांच्या केबीन मध्ये ही बघीतल होत म्हणून मी त्यांचे स्केच क्लीयर काढू शकेन.नितारा सांगते

 

ओके गुड, आपण लगेच माझ्या घरी जाउत चालेल न तुला म्हणजे आपल्याला निवांत आपल काम करता येइल. विक्रम विचारतो.

 

हो, चालेल पण काही प्रॉब्लेम तर होणार नाही न.?” नितारा काळजीने विचारते.

 

नितारा मला एक गोष्ट समजत नाही तुला एवढी कसली भीती वाटत आहे? सत्याच्या बाजुने कुणी तरी उभ रहायला हवच न अस प्रत्येक वेळा घाबरुन कस चालेल.विक्रम समजावत विचारतो.

 

मी कुठे ही गोष्ट नाकारत आहे. पण फॅमिलीची सेफ्टी देखील महत्वाची असते न. त्यातुन माझे स्वःताचे प्रॉब्लेम्स सुध्दा आहेतच की त्यात अजुन भर पडली तर. खर सांगु दादा मला माझी काळजी नाहीये माझ्या कुटूंबाची काळजी आहे. म्हणून विचारल तुला. नितारा काळजीने सांगते.

 

हे बघ, मला अजुन ही तुझा नेमका काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाहीये. तरी पण मी तुला शब्द देतो तुला आणि तुझ्या फॅमिलीला मी काहीही होउ देणार नाही माझ्यावर विश्वास आहे न तुझा. विक्रम विचारतो.

 

हो दादा तुझ्यावरच तर विश्वास आहे मला ठीक आहे मी मदत करायला तयार आहे. चल आपण तुझ्याकडे जाउत मी स्केच बनउन देते तुला. नितारा सांगते.

 

आणि लगेच दोघ ही विक्रमच्या घराकडे रवाना होतात.

 

काही वेळा नंतर...

 

इंन्सपेक्टर विक्रमच घर....

 

वेळ संध्याकाळची...

 

संध्याकाळची वेळ असते एव्हाना रुपल सुध्दा घरी पोहोचलेली असते आणि सगळे एकत्र चहा घेत असतात तोच विक्रम आणि नितारा घरी पोहोचतात.

 

क्रमशः...

 

काय आता नितारा विक्रमला मदत करणार आहे म्हणजे अजुन काही वाढून ठेवलय का तीच्या आयुष्यात? बघुत पुढील भागत.

 

असुरनाश - (भाग ५)

 



असुरनाश – भाग ५

संजीवन कॉलेजच टेरेस...

नितारा चिठ्ठी घेउन पळत कॉलेजच्या टेरेसवर येते आणि चिठ्ठी वाचू लागते.

खबरदार... तुझ्या आयुष्यातली घटना कुणाला सांगितलीस तर परिणाम चांगले होणार नाहीत मी कोण आहे आणि माझा तुझ्याशी काय संबंध आहे हे तुला जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हाच कळेल त्या आधी नाही. लवकर तुला आणखी एक धक्का बसणार आहे  त्यासाठी तयार रहा अननोन व्यक्ती.

चिठ्ठी वाचुन नितारा अजुनच हादरते आणि विचार करु लागते.

आता आणखी काय वाढवून ठेवलय लाईफ मध्ये काय चालु आहे हे बोलु का विक्रम दादाला पण काही घडल तर काय करु.” नितारा हातात चिठ्ठी घेउन विचार करत असते.

तोच तीला शोधत शोधत रुपल टेरेस वर येते आणि निताराला काळजीने विचारते.

तारा. काय ग अशी निघुन का आलीस सगळ ठीक आहे न तुझ्या बद्दल दादा विचारत होता. रुपल काळजीने विचारते.

तोच भानावर येत नितारा विचारते.

अं, तु त्याला काही सांगितल नाहीस न?“ भानावर येत नितारा विचारते.

नाही, पुर्ण सांगितल नाहीये फक्त तुला काही तरी बोलायच आहे एवढच सांगितल आहे. पण तु अस का विचारलस आपल तर ठरल होत न दादाशी बोलायच म्हणून. रुपल विचारते.

हो, पण आता माझा विचार बदलला आहे आणि याच कारण मला प्लीज विचारु नकोस.भीतीच्या स्वरात नितारा म्हणते.

आणि तिथुन निघुन जाते.

काही वेळा नंतर...

सगळे जण कॉलेजच्या कँटीनला भेटतात आणि निताराचा बर्थडे सेलीब्रेट करतात. पिझ्झा, बर्गर, कोलड्रींक मागवण्यात आलेल होत. निताराच्या मनात नसताना ही ती सुद्धा सगळ्यांमध्ये सहभागी झाली होती आणि अशातच त्याची देखील पुर्ण तीच्यावर नजर होती.

वेळ संध्याकाळची...

निताराचा पुर्ण दिवस काळजीतच गेलेला असतो आणि ती तसच कॉलेज संपवुन घरी जायला निघते. ती आपल्याच विचारात असते आणि अशातच तीला त्या मुली बद्दल आठवत.

आठवणीत...

प्लीज मला हे करायला भाग नको पाडुस मी नाही करु शकणार हे प्लीज अस नको वागुस माझ्याशी. नको... नको... मी हे नाही पिणार सोड सोड मला.ती अननोन मुलगी

घे, पी.. हे तुला प्यावच लागेल रेश्मा. पी सगळ पी.एक सिनीअर मुलगी

नितारा लगेच भानावर येते आणि विचार करु लागते.

काय करु मी दादाला सांगु का या बद्दल तसही मी एकटीनेच पाहील होत ते काय माहीत दादाला काही लींक मिळेल यातुन. नाही नको मला माझेच टेंन्शन्स काही कमी आहेत का ह्या गोष्टी बोलले तर अजुन काही तरी होइल त्यापेक्षा शांत बसलेल बर. पण मग रेश्माच काय माझ्या मुळे एका निश्पाप मुलीचा जीव जाइल का छे डोक्याचा नुसता भुंगा झालाय इथे आधिच माझे प्रश्न सुटत नाहीयेत त्यात आणखी एक भर. पण बोलल तर पाहीजेच ना काय माहीत अजुन तिच्या बाबतीत काय होत असेल करतेच फोन. नितारा विचारातच असते.

काही क्षणा नंतर...

नितारा एकदा सगळीकडे आपली नजर फिरउन कुणी आहे का बघते आणि विक्रमला कॉल लावते.

देशभक्तीपर गीताची कॉलरट्युन वाजते.... आणि विक्रम कॉल उचलतो.

हॅलो, बोल नितारा कशी आहेस काही बोलायच होत का?” आपल काम करता करता विक्रमने विचारल.

हो, दादा पण फक्त तुझ्याशीच  तीथे अजुन कोणी नको. चालता चालता नितारा बोलु लागली.

ठीक आहे, मग कुठे भेटायच तु सांग मी येतो आणि काळजी करु नकोस मी आहे तुझ्या बरोबर घाबरु नकोस. विक्रमने तीला समजावल.

ठीक आहे दादा, तु कॉलेज समोर जे कॅफे आहे न तीथ ये आपण तीथे भेटुत.नितारा सांगते

ठीक आहे माझ त्याच दिशेला काम आहे मी लगेच निघतो तु सावध रहा मी येतोच. विक्रम बोलतो

आणि दोघ ही आपापले फोन ठेवतात. लगेच विक्रम कॅफेकडे जायला निघतो तसेच नितारा ही कॅफेत जाते.

काही वेळा नंतर....

नितारा कॅफेत पोहोचते आणि विक्रमची वाट बघत बसते. तोच विक्रम सिवील ड्रेसमध्ये येतो.

विक्रम कॅफेच्या दारात उभ राहुन कॅफेवरुन एक नजर फिरवतो तोच त्याला नितारा दिसते आणि तो त्या टेबलकडे वळतो.

हाय, नितारा कशी आहेस. समोरच्या खुर्चीवर बसत विक्रम विचारतो.

क्रमशः

काय, निताराने बोलायच ठरवलय मग आता पुढे काय होणार बघुत पुढील भागात.

असुरनाश - (भाग - १०)

    असुरनाश – (भाग – १०)   “ आता कोणत्या व्हिडीओ बोलतोय हा ? काय सुरु आहे नीतारा हे सगळ. ” विक्रमने नोट वाचुन विचारल   “ दादा, मला ...