असुरनाश – भाग ७
“ये, तु हॉल मध्ये
बस तोपर्यंत मी स्केच आर्टीस्टना बोलावतो.” विक्रम निताराला
हॉलमध्ये बसवतो.
विक्रम निताराला
हॉलमध्ये बसउन स्केच आर्टीस्टना फोन करायला आपल्या रुम मध्ये निघुन जातो.
फोनची रिंग वाजते...
तोच स्केच आर्टीस्ट
अजीत आपला फोन उचलतो.
“हॅलो, बोला साहेब
काय मदत करु शकतो मी तुमची?” स्केच आर्टीस्ट अजीत विचारतो.
“अजीत एक काम आहे तुझ्याकडे
एक स्केच काढायच आहे येउ शकतोस का?” विक्रम
“हो, लगेच येतो
साहेब निघालोच.” स्केच आर्टीस्ट अजीत
“हो.. हो.. पण ऑफिस
मध्ये नाही तुला घरी याव लागणार आहे मी तुला ऍडरेस सेंड करतो तु लगेच निघ.” विक्रम सांगतो.
“ओके, साहेब तुम्ही
ऍडरेस सेंड करा मी लगेच निघतो.” स्केच आर्टीस्ट अजीत
दोघ ही आपापल बोलण
संपवतात आणि फोन ठेउन देतात. लगेच विक्रम अजीतला आपला ऍडरेस सेंड करतो. आणि तोच
अजीत विक्रमकडे जायला निघतो.
काही वेळा नंतर...
नितारा रुपल आणि
रुपलचे आई बाबा गप्पा मारत बसलेले असतात. तोच आपल्या रुम मधुन विक्रम बाहेर येतो.
“मग, काय नितारा आज
दिवसभर काय केलस आज वाढदिवस आहे ना तुझा?” शालीनी विचारते
शालीनी रुपल आणि
विक्रमची आई आणि गायत्री दोघी मैत्रीणी आणि पार्टनर असतात त्यामुळे रुपलची फॅमिली
निताराला आणि तीच्या फॅमिलीला चांगलच ओळखत असतात. त्याच नात्याने शालीनी विचारते.
“हो, काकु माझा आज
वाढदिवस आहे आम्ही फ्रेंड्सनी मीळून खुप एंजॉय केल आज.”
नितारा सांगते.
“हो, न आई निताराचा
वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असते आज इतक एंजॉय केलय आम्ही विचारु नकोस.”
आनंदात येउन रुपल सांगते.
“का विचारायच नाही
रुप्स काही लपवत आहेस वाटत.” चेष्टेने विक्रम विचारतो.
“काय रे दादु, काही
पण हं...” रुपल म्हणते.
आणि सगळे एकदम हसु
लागतात. तोच अजीत येतो.
“मी आत येउ का सर?”
दारावर नॉक करत अजीत विचारतो.
“अरे, ये.. ये अजीत
फॉरमॅलिटी कसली ये आत ये.” विक्रम म्हणतो.
तोच अजीत घरात येतो.
“ये अजीत मी तुझीच
वाट बघत होतो मी तुझी ओळख करुन देतो. ही नितारा ही आपल्याला स्केच बनउन देण्यात
मदत करणार आहे आता ही जस जस सांगेल तस तस मला स्केच काढून दे.” निताराची ओळख करुन देत विक्रम सांगतो
लगेच तीघही स्केच
काढायला सुरवात करतात.
काही वेळा नंतर...
“सर, स्केच तयार
झालय.” स्केच दाखवत अजीत सांगतो.
“काय? स्केच तयार झालय गुड, बघु. नितारा एकदा तु ही बघ ही
तीच मुलगी आहे.” स्केच बघत विक्रम म्हणतो.
नितारा स्केच बघायला
येते आणि लगेच म्हणते.
“हो दादा, ही तीच
मुलगी आहे कनर्फम.” नितारा स्केच बघुन सांगते.
इकडे हे सगळ बघुन
रुपलला आश्चर्य वाटत आणि ती लगेच निताराला विचारते.
“नितारा (हळु
आवाजात). काय आहे हे तु सांगणार नव्हतीस न.” रुपल विचारते.
“अग, मी दादाला त्या
मिसींग केस मध्ये मदत करत आहे शांत रहा थोडी.” नितारा सांगते
“बघु कोण मुलगी आहे
ती?” स्केचकडे बघत रुपल म्हणते.
आणि स्केच बघते. तर
लगेच आश्चर्याने म्हणते.
“ही तर शीना आहे मी
चांगलीच ओळखते हीला हीचा लहान भाउ माझा क्लासमेट आहे. नेहमी क्लब एन शाइन बार
मध्ये टल्ली होउन पडलेली असते विचारणार कोणीच नाही त्यामुळे आपल्याच मर्जीची मालक.
पण तुला हीच का बर स्केच हव होत.?” रुपल विचारते.
“रुपल तु सांगितलेल
खरय?” विक्रम विचारतो.
आणि लगेच रुपल मानेनेच
होकार देते.
क्रमशः
काय रेश्मा मिसींग केस
मधली सगळ्यात मोठी लिड इतक्या लवकर मिळाली काही गडबड तर नाही ना बघुत पुढील भागात.
%20-%20Freepik%20(170324123838).jpg)
No comments:
Post a Comment