असुरनाश – भाग ६
“अरे, दादा तू ? तू कधी आलास मी कधी पासुन तुझी वाट बघत होते बैस न.” विक्रमला बसायला सांगत नितारा म्हणते.
आणि विक्रम लगेच
आपल्या खुर्चीवर बसतो.
“हं, बोल तुला काय
मला सांगायच आहे ते. खर तर मी सुद्धा आज तुला नोटीस केल होत की, तु कसल्या तरी
काळजीत आहेस पण मी स्वःताच माझ्या विचारात होतो म्हणून काही बोललो नाही आणि सगळा
राग तुझ्या मैत्रीणीवर निघाला. आता बोल तुला काय सांगायच आहे ते.” विक्रम ने विचारल
“अरे, दादा ते सोड
आपण मझ्या बद्दल नंतर बोलुत तु सकाळी ज्या मुली बद्दल मला विचारत होतास न त्याची
एक लिंक मला आठवली आहे म्हणून तुला बोलाउन घेतल आणि सॉरी बर का सकाळी एवढ तु मला
आवाज देत होतास आणि मी तुझ्याशी काहीच न बोलता निघुन गेले आय एम सो सॉरी.” नितारा सांगते.
“तु त्या मुलीचा
विचार करुन मला बोलाउन घेतलस? म्हणजे तुला तुझ्या बद्दल
काहीच सांगायच नाहीये मला?” विक्रमने आश्च-याने विचारल
“दादा, प्लीज थोड
हळु इथे आपल ऐकणारे बरेच जण आहेत खर तर मला माझ्या विषयाबद्दल देखील बोलायच आहे पण
आज नको आज त्या मुली बद्दल बोलुत मला एक खुप मोठी लिंक आठवली आहे पण ती लिंक
तुझ्या कितपत कामी येइल हे काही मला सांगता येणार नाही.”
निताराने सांगितल
“नितारा, मला खरच
तुझ खुप कौतुक वाटतय ग तु स्वःता प्रॉब्लेम मध्दे आहेस आणि तरी त्या मुलीचा विचार
करत आहेस तु खुप ग्रेट आहेस बर सांग तुला काय माहीत आहे तीच्या बद्दल आणि हो तु
काळजी करु नकोस हं मी आहे तुझ्याबरोबर.” विक्रम समजावत
म्हणाला.
“खर तर दादा मला जास्त
माहीत नाही पण ती आमच्या हॉस्टेलवर नव्यानेच आली होती मी हॉस्टेल वर रहात नाही पण
माझ्या ब-याच मैत्रीणी हॉस्टेल वर रहातात मी अधुन मधुन त्यांना भेटायला जात असते
असच एक महीन्या पुर्वी सुद्धा गेले होते तेव्हा मी बघीतल की, तीन चार मुलींनी तीला
घेरल होत आणि काही तरी तीला पाजत होते. आणि नेमक मी तीथे पोहोचले पण त्या मुली
नेमक्या कोण होत्या हे माहीत नाही मला.” नितारा म्हणाली.
“काय? तु त्या मुलींना तीला काही तरी पाजताना बघीतलस?
म्हणजे नेमक काय पाजत होत्या त्या मुली तीला आणि अजुन काही सांगु शकतेस का तीच्या
बद्दल म्हणजे तीच नाव वगैरे.?” विक्राम विचारतो.
“तीच नाव रेश्मा. हो
मी रेश्माच ऐकल होत तेव्हा. पण त्या मुलीं बद्दल सांगु शकणार नाही मी काही.”
नितारा सांगते.
“अग, तुला माहीत
नाही तु कीती मोठी लिंक सांगितली आहेस या वरुन खुप काही समजेल मला. ओके मला एक
सांग तु क्लीयर बघीतल होतस त्या मुलींना.” विक्रम विचारतो
“हो, मी त्यांना
क्लीयर बघीतल होत.” नितारा सांगते.
“मग, तु त्यांच
स्केच काढुन देण्यात मला मदत करशील.?” विक्रम
“हो, नक्कीच कारण
त्यांचा चेहरा माझ्या डोक्यात पक्का बसलेला आहे म्हणून मी त्यांच स्केच काढून
देण्यास नक्कीच तुला मदत करेल.” नितारा
“ग्रेट, पण तु इतक
क्लीयरली कस सांगु शकत आहेस तुला अजुन काही आठवत आहे का?”
“हो, दादा ऍक्चुली
त्या मुलीं मधल्या एका मुलीच्या हातात मी एक पुडी बघीतली होती आणि ती पावडर ती
एकसारखी आपल्या नाकात घालत होती. आणि त्या मुलींना मी एक दोनदा प्रिंन्सीपल
सरांच्या केबीन मध्ये ही बघीतल होत म्हणून मी त्यांचे स्केच क्लीयर काढू शकेन.”
नितारा सांगते
“ओके गुड, आपण लगेच
माझ्या घरी जाउत चालेल न तुला म्हणजे आपल्याला निवांत आपल काम करता येइल.” विक्रम विचारतो.
“हो, चालेल पण काही प्रॉब्लेम
तर होणार नाही न.?” नितारा काळजीने विचारते.
“नितारा मला एक
गोष्ट समजत नाही तुला एवढी कसली भीती वाटत आहे? सत्याच्या
बाजुने कुणी तरी उभ रहायला हवच न अस प्रत्येक वेळा घाबरुन कस चालेल.” विक्रम समजावत विचारतो.
“मी कुठे ही गोष्ट
नाकारत आहे. पण फॅमिलीची सेफ्टी देखील महत्वाची असते न. त्यातुन माझे स्वःताचे
प्रॉब्लेम्स सुध्दा आहेतच की त्यात अजुन भर पडली तर. खर सांगु दादा मला माझी काळजी
नाहीये माझ्या कुटूंबाची काळजी आहे. म्हणून विचारल तुला.”
नितारा काळजीने सांगते.
“हे बघ, मला अजुन ही
तुझा नेमका काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाहीये. तरी पण मी तुला शब्द देतो तुला आणि
तुझ्या फॅमिलीला मी काहीही होउ देणार नाही माझ्यावर विश्वास आहे न तुझा.” विक्रम विचारतो.
“हो दादा तुझ्यावरच
तर विश्वास आहे मला ठीक आहे मी मदत करायला तयार आहे. चल आपण तुझ्याकडे जाउत मी
स्केच बनउन देते तुला.” नितारा सांगते.
आणि लगेच दोघ ही
विक्रमच्या घराकडे रवाना होतात.
काही वेळा नंतर...
इंन्सपेक्टर विक्रमच
घर....
वेळ संध्याकाळची...
संध्याकाळची वेळ असते
एव्हाना रुपल सुध्दा घरी पोहोचलेली असते आणि सगळे एकत्र चहा घेत असतात तोच विक्रम
आणि नितारा घरी पोहोचतात.
क्रमशः...
काय आता नितारा
विक्रमला मदत करणार आहे म्हणजे अजुन काही वाढून ठेवलय का तीच्या आयुष्यात? बघुत पुढील भागत.
%20-%20Freepik%20(170324123838).jpg)
No comments:
Post a Comment