असुरनाश – भाग ४
संजीवन कॉलेज...
वेळ सकाळी ९
वाजताची...
कॉलेजच पार्कींग
एव्हाना मुलां मुलींनी गच्च भरुन गेल होत. नितारा मात्र त्या गरदीत कुठेतरी हरवली
होती खर तर कशातच तीच लक्ष लागत नव्हत ती अजुनही विचारमग्नच होती. तोच तीच्या
मित्र मैत्रीणीं मधुन एकानी दोघींना एक न्युज दिली.
“रुपल, तुला कळाल का? आपल्या कॉलेज मधुन एक मुलगी गायब झाली आहे आणि तुझा भाउच याचा तपास करत
आहे.” रजतने पळत येउन सांगितल
“काय, भाई ईकडे
कॉलेजमध्ये आलाय मला काहीच बोलला नाही आहे कुठे तो.” आश्चर्याने
रुपलने विचारल.
“आपल्या कॉलेज
कॅम्पस मध्ये आलाय सगळ्यांचीच विचारपुस सुरुए.” रजतने
सांगितल.
आणि लगेच तीघही कॅम्पस
कडे निघुन जातात.
काही वेळा नंतर....
संजीवन कॉलेज
कॅम्पस...
आज कॉलेज कॅम्पस मुलां
मुलींनी भरलेल होत ते फक्त इन्सपेक्टर विक्रममुळे कारण कॉलेजला आज चौकशीसाठी
रुपलचा भाउ विक्रम आला होता. आणि रुपलने आपल्या भावा बद्दल आधीच खुप काही
सांगितलेल होत म्हणूनच सगळे त्याला बघायला जमले होते.
आणि तो होताही तसाच.
बाणेदार रुबाबदार एकदम डॅशिंग उंचपुरा पाहताक्षणी कुणाला ही आवडेल असाच आणि
म्हणूनच त्याला पहायला सगळे जमले होते. तो कॉलेजच्या सगळ्या मुलां मुलींमधे उभा
होता आणि तोच त्याने सगळ्यांची चौकशी सुरु केली.
“हाय, मी इन्सपेक्टर
विक्रम रुपलचा मोठा भाउ मी इथे एका चौकशीसाठी आलो आहे तुमच्याच कॉलेजमधील एक मुलगी
कॉलेजमधुन गायब झाली आहे मी त्यासाठीच इथे आलो आहे आणि मला आशा आहे तुम्ही मला यात
मदत कराल हा तीचा फोटो.” फोटो दाखवत विक्रमने सांगितल.
तस सगळे निरखुन फोटो
पाहु लागले.
काही क्षणा नंतर...
“कुणाला माहीत आहे
का ही मुलगी (थोडस थांबून). हे बघा एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा म्हणून
नीट लक्ष देउन बघा आणि कुणाला माहीत असेल तर सांगा घाबरु नका.” पुन्हा एकदा विक्रमनी विचारल
तस सगळे एकमेकांकडे
बघु लागले. तोच निताराने समोर येउन विक्रमला विचारल.
“दादा एकदा फोटो
दाखवतोस का? (हातात फोटो घेउन आठवायचा प्रयत्न करत). ह्या
मुलीला मी कुठेतरी बघीतल आहे पण कुठे ते नेमक आठवत नाहीये.” आठवायचा
प्रयत्न करत नितारा म्हणाली.
“तु नितारा आहेस न
रुपलची मैत्रीण? परत एकदा आठवुन बघ हीला कुठ बघीतल आहेस मला
खुप मदत होइल तुझी.” विक्रमने समजावत सांगितल
सगळेच आपापसात बोलत
होते नितारा ही आठवायचा प्रयत्न करत होती तोच कोणीतरी तीच्या हातात एक चिठ्ठी दिली
आणि तीथुन गायब झाला. तोच त्या चिठ्ठीचा स्पर्ष होताच नितारा परत घाबरली आणि
कुणाला ही न सांगता तिथुन निघुन गेली विक्रम मात्र तीला आवाज देत राहीला.
काही वेळा नंतर...
“रुपल, अशी काय तुझी
मैत्रीण मी तीला एवढा आवाज देत होतो साध थांबता आल नाही तीला? तीला कॉमन्सेस नावाचा काही प्रकार आहे की नाही वेडे आहोत का आम्ही लोक
इथे थांबून वाट बघत बसायला.” विक्रम रुपलवर चिडत म्हणाला.
“अरे दादा धीर धर
जरा, सिच्युएशन काय आहे ते तर समजुन घे. नक्कीच काही तरी घडल असणार त्या शिवाय
नितारा अशी वागणार नाही हे बघ मी तुला जास्त काही सांगू शकत नाही पण खर तर ती
स्वतःच एका संकटात सापडली आहे आणि तीला तुझी त्यासाठी अनऑफिशली भेट घ्यायची आहे
म्हणजे पोलीस ऑफिसर म्हणून नाही तर माझा भाउ म्हणून ऍक्चुली तीला भीती वाटतीये ती
तुला भेटली तर घरच्यांना तीची काळजी वाटेल अस. इनफॅक्ट मी
स्वतःच तुला हे आज सांगणार होते त्या आधीच तु इथे आलास.”
रुपल समजावत म्हणाली.
“अरे, पण तीच्या
वडीलांना मी तुझा भाउ आहे आणि मी एक पोलीस ऑफिसर आहे हे आधीच माहीत आहे ना मग
लपवुन काय होणार आहे.” विक्रमने विचारल
“दादा प्रश्न माहीत
असण्याचा नाहीये निताराच्या आई बाबांना तु एक ऑफिसर आहेस हे माहीत आहे. आणि ही
गोष्ट तीला ही माहीत आहे फक्त जे काही तीच्या लाईफ मध्ये सुरु आहे ते तीला
घरच्यांना सांगायच नाहीये इतकच. आता तुला सांगायच म्हणजे तीला हेडक्वारर्टरला याव
लागणार म्हणजे सगळच घरी कळणार आणि हेच तीला होउ द्यायच नाहीये म्हणून तीला तुला
बाहेर भेटायची ईच्छा ही होती.” रुपलने सांगितल.
“हं, असय का ठीक आहे
भेटव तीला मला मी भेटेन तीला आज काय तुमच ते सेलिब्रेशन आहे न करा व्यवस्थित मग
आपण या विषयावर बोलुत चल मी येतो बाय.” भेटण्याच मान्य करुन
विक्रम निघुन जातो.
आणि इकडे रुपल
निताराला शोधु लागते..
क्रमशः...
काय लिहील असेल त्या
चिठ्ठीत आणि नितारा कुठे गेली बघुत पुढील भागात.
%20-%20Freepik%20(170324123838).jpg)
%20-%20Freepik%20(170324123838).jpg)
%20-%20Freepik%20(170324123838).jpg)
%20-%20Freepik%20(170324123838).jpg)