असुरनाश – (भाग ८)
“हो, दादा अगदी खरय
मी खुपदा माझ्या क्लासमेट बरोबर शीनाला बघीतल आहे. राकेश नाव आहे त्याच दोघही बहीण
भाऊ सारखेच शीनाला बारची आवड आणि राकेशला दादागिरीची आवड गँग बरोबर उनाडक्या करत
फिरायच सिनीअर्स बरोबर राहुन आपल्याच क्लासमधल्या मुला मलींना छळायच एवढच दोघांना
जमत. (थोडस थांबून) हो, करेट मी सुध्दा रेश्माला राकेश बरोबर बघितल होत. बिचारी
खुप रडत होती ती.” रुपल फोटो पाहुन सांगते
हे ऐकताच विक्रम विचार
करु लागतो.
“हं, म्हणजे
रेश्माला गायब करण्यात या दोघांचा तर हात नसेल” फोटोकडे बघत
विक्रम विचार करु लागतो.
काही क्षणा नतंर...
विक्रम विचार करतो आणि
लगेच आपला असिस्टंट सुसृतला फोन करतो.
फोनची रिंग वाजते. तोच
समोरुन सुसृत फोन ऊचलतो.
“हॅलो सर तुम्ही कॉल
केला होतात?” सुसृत
“हो, ती संजीवन
कॉलेजच्या मुलीची मिंसीग केसमध्ये एक वेगळ वळण आलय मी तुला काही डिटेल्स सेंड करतो
तु तीची अजुन माहीती मिळते का ते बघ आणि मला कळव.” विक्रम
सांगतो
“हो, सर मी माहीती
काढतो तुम्ही मला डिटेल्स पाठवा.” सुसृत
“ओके, मी लगेच
पाठवतो.” विक्रम म्हणतो.
आणि दोघ ही आपापले फोन
ठेऊन देतात. लगेच विक्रम डिटेल्स पाठवतो.
काही क्षणा नंतर...
“दादा, मी येऊ का
आता खुप ऊशीर झालाय ओलरेडी.” नितारा विचारते.
“अग, थांब एवढी घाई
काय आहे मी तुला सोडतो.” विक्रम बोलतो.
“ठीट आहे पण थोड
लवकर हं.” स्माईल करुन नितारा म्हणते.
लगेच विक्रम आपल
आवरायला जातो.
काही वेळा नंतर...
“हं, चल आता निघुत
आपण. तु तयार आहेस?” विक्रम कॉलर ठीक करत विचारतो.
“हो, चल आपण निघुत
दादा.” नितारा म्हणते.
आणि लगेच दोघ ही
निताराच्या घरी रवाना होतात.
“एक विचारु नितारा
तुला? तुला राग तर येणार नाही ना.”
विक्रम विचार.
“हो, विचार की त्यात
एवढी फॉरमॅलिटी कसली रे?” नितारा
“काही नाही ग आधी
मला सांग तुला माझ्यावर विश्वास आहे ना.” विक्रम विचारतो
“दादा, काय झालय? अचानक अस का विचारत आहेस? ओह, समजल माझा प्रॉब्लेम
न. (थोडस थांबून). दादा, त्या प्रॉब्लेम बद्दल मलाच अजून माहीत नाहीये ती कोण
व्यक्ती आहे, तीचा माझ्याशी काय संबंध काहीच कळत नाहीये मला. मग मी तुला काय
सांगणार होते तुच बोल.” काळजीने नितारा सांगते
“व्यक्ती? कोण व्यक्ती? नितु बाळा तुला एक सांगतो आपली फॅमिली
एकमेकांची फॅमिली फ्रेंड आहे. याच नात्याने जशी माझ्यासाठी रुपल आहे तशीच तु ही
आहेस तेव्हा तुला काहीच काळजी करण्याच कारण नाहीये बेटा मी तुझा ही मोठा भाऊच आहे.
तु मला तुझा प्रॉब्लेम शेअर करु शकतेस एक काम करायच का आपण घरी जाता एका कॅफेमध्ये
जाऊत चालेल. तु मला सांग तुला काय सांगायच आहे ते मग पाहुत आपण कसा शोध लावायचा ते
हं.” गाडी चालवता चालवता विक्रम विचारतो.
“ठीक आहे, दादा जाऊत
आपण कॅफेत चल. तुला मी सांगते सगळ.” स्मीत हास्य करत नितारा
म्हणते.
आणि दोघ ही सन शाइन
कॅफेत जातात.
साधारण एक तासा
नंतर...
सन शाइन कॅफेत...
वेळ रात्री ८
वाजताची...
सन शाइन कॅफे नुसत
गजबजलेल असत. रात्र असल्याने नुसता झगमगाट असतो आणि अशातच विक्रम कॅफेत कार घेऊन
येतो. कुणी आपली गाडी पार्क करत असत तर वेटर्स आपापली काम करण्यात मग्न असतात. तोच
आपली कार पार्क करुन दोघ कॅफेत शिरतात.
विक्रम एकदा कॅफेवरुन
नजर फिरवतो. आणि म्हणतो.
“नितारा तो बघ
समोरचा टेबल रिकामा झालाय आपण तिथे बसुत चल.” विक्रम म्हणतो.
आणि दोघ टेबल कडे
वळतात.
क्रमशः...
काय तर नितारा शेवटी
आपला प्रॉब्लेम विक्रमला सांगणार. पण याचा उलटा परिणाम तर होणार नाही न. समजणार तर
नाही ना त्या व्यक्तीला बघुत पुढील भागात.
%20-%20Freepik%20(170324123838).jpg)
%20-%20Freepik%20(170324123838).jpg)
%20-%20Freepik%20(170324123838).jpg)
%20-%20Freepik%20(170324123838).jpg)